कंचकुला :  बलात्कार प्रकरणी आरोपात दोषी डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहिमला सीबीआय कोर्टाने तब्बल २० वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दरम्यान, त्याच्या सोबत सावलीप्रमाणे राहणारी महिला कोण असा सर्वांना प्रश्न पडला होता. ती त्याची मानलेली मुलगी होती. मात्र, तिचे खरे नाव कोणाला माहीत नाही. तिच्या खऱ्या नावाचा उलगडा झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन साध्वींवर बलात्कार प्रकरणात १० - १० अशी २० वर्षांची शिक्षा बाबा गुरमीत राम रहिमला सुनावण्यात आली आहे. या अगोदर डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीमला १० वर्षाची शिक्षा सुनावली होती. मात्र कोर्टाने आता ती २० वर्षाची केली आहे.  शिक्षेची सुनावणी होत असताना राम रहिम न्यायालयामध्ये रडला. आणि आपण चांगलं काम केल्यामुळे मला शिक्षेत सूट मिळावी अशी मागणी त्यानं न्यायालयात केली. राम रहिम हा सीबीआयचा कैदी नंबर १९९७ असणार आहे. 


दरम्यान, त्याच्या मानलेली मुलगी हनीप्रीत इन्सान  (Honeypreet Insan)त्याच्यासोबत होती. मात्र, तिचे नाव कोणाला माहीत नसल्याने ही महिला कोण असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. मात्र, ही मानलेली मुलगी कोण. तिचे मूळ नाव काय याची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. या हनीप्रीत इन्सानचे खरे नाव प्रियंका तनेजा आहे. ती हिसारजवळील फतेहबाद येते राहणारी आहे. १९९९ रोजी सिरसा येथील डेराचे अनुयायी विश्वास गुप्ता यांच्याशी विवाह केला.