श्रीनगर : फुटिरतावादी नेत्यांचा आज श्रीनगरमध्ये बैठक घेण्याचा प्रयत्न जम्मू-काश्मीर पोलिसांनी उधळून लावला. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांत वाढलेल्या दगडफेकीच्या घटना यामागे फुटिरतावादी असल्याची शंका NIAच्या कारवाईमुळे बळकट झालीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नेत्यांचा गुप्त बैठकीचा कट पोलिसांनी उधळून लावणं हे या कारवाईचं मोठं यश मानलं जातंय. हुर्रीयतचा जहालमतवादी नेता सय्यद अली शाह गिलानी याच्या घरी ही बैठक होणार होती.


पोलिसांनी केलेल्या कारवाईत मिरवेझ उमर फारूक याच्यासह अनेक फुटिरतावादी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलंय. गिलानीच्या हैदरपुरा इथल्या घराबाहेर पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवलाय. इथं बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेण्याचाही फुटिरतावाद्यांचा मानस होता.