शिलॉन्ग : देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र लॉकाडऊन सुरु असतानाच मेघालय सरकराने लोकांची मागणी पाहता राज्यात सोमवारपासून वाईन शॉप सुरु करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी अधिकाऱ्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाईन शॉप सुरु केले तरी ग्राहकांना सोशल डिस्टंन्सिगं पाळण्याचं, एकमेकांपासून योग्य ते अंतर राखण्याच्या सक्तीचे आदेश देण्यात आले आहेत. या दरम्यान सर्वांनी हात स्वच्छ करण्यावरही भर देण्यात आला आहे.


आयुक्त प्रवीण बक्शी यांनी सर्व जिल्हा उपायुक्तांना पत्र लिहून याप्रकरणी राज्य सरकारच्या निर्णयाची सूचना दिली आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, राज्य सरकारने सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत वाईन शॉप सुरु ठेवण्यास मंजूरी देण्यात आली आहे. यावेळी एकमेकांमध्ये सोशल डिस्टंन्सिंग पाळण्याचं आणि वारंवार हात स्वच्छ करण्याच्या सक्तीचं पालन करणं आवश्यक असल्याचं सांगण्यात आलं आहे.


राज्यात लॉकडाऊनमुळे वाईन शॉप 25  मार्चपासून बंद होते. 


देशात आतापर्यंत ९१५२हून अधिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर २६५हून अधिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यापैकी ८५६ जण बरे झाले असून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जगभरात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा १८ लाखांवर गेला असन १ लाख १४ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ३५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात एकूण ३०८ जणांचा बळी गेला आहे.