श्रीनगर : जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) मधून आर्टिकल 370 हटवल्यानंतर पीडीपी (PDP) नेता महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) या सतत केंद्र सरकार विरोधात वक्तव्य करत आहेत. त्यातच आता त्यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा मिळवल्यानंतर महबूबा मुफ्ती यांनी त्यावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महबुबा मुफ्ती यांनी कुलगाममध्ये मोदी सरकारसा इशारा दिला आहे. त्यांनी शेजारील (अफगाणिस्तान) देशाकडे पाहावं. जेथे सुपरपॉवर अमेरिकेला ही पळून जावं लागलं. जर वाजपेयी डॉक्टरिननुसार पाकिस्तान सोबत चर्चा नाही केली तर इथेही असंच होईल. सरकार जर कश्मीरच्या संयमाची परीक्षा घेत असेल तर एक दिवस त्यांना पराभव स्वीकारावा लागेल.


महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, 'मी पुन्हा पुन्हा सांगतेय, सुधारा. शेजारी पाहा काय होतंय. पाकिस्तान सोबत चर्चा करा नाहीतर वेळ निघून जाईल.


महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, JK चे तुकडे केले. या चूक सुधारा. लोकं विचार करतात की ही काय करेल. पण कधी-कधी एक मुंगी देखील हत्तीच्या सोंडीत घुसते. तर त्याचं ही जगणं कठीण करते.


महबूबा (Mehbooba Mufti) यांन इशारा दिला की, काश्मीरी लोकांना कमजोर समजू नका. ते धैर्यशील आहेत. म्हणूनच त्यांनी अजून बंदूक उचलली नाही. ज्या दिवशी त्यांचा संयम तुटेल त्या दिवशी सगळं काही संपून जाईल.


महबूबा मुफ्ती यांनी म्हटलं की, जेव्हा देश स्वातंत्र्य झाला. तेव्हा मुस्लीम बहुल जम्मू काश्मीर एक स्वतंत्र राज्य होतं. पंडित नेहरू आणि काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीर (Jammu Kashmir) भारतात आला.


महबूबा मुफ्ती (Mehbooba Mufti) ने भारत सरकार आणि तालिबानला एकाच तराजूत ठेवलं आहे.