नवी दिल्ली : शुक्रवारी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी बोलावलेल्या बैठकीत पश्चिम बंगालची मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव आणि बीएसपी अध्यक्ष मायावती यांच्यासह १७ पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या बैठकीत राष्ट्रपती निवडणुकीबाबत चर्चा झाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत लोकसभेच्या माजी अध्यक्षा मीरा कुमार यांच्या नावाची राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी चर्चा झाली. याआधी माजी केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं नाव चर्चेत होतं. आता मीरा कुमार यांचं नाव चर्चेत आहे. पण बैठकीनंतर बोलतांना ममता बॅनर्जी यांनी सध्या कोणत्याही नावाची चर्चा न झाल्याचं म्हटलं आहे.


विरोधी पक्षांची बैठक संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं की, सहारनपूर, काश्मीर आणि ईवीएम मशीनचे डेमो या मुद्द्यांवर चर्चा झाली.