कोरेगाव भीमा हिंसाचारावर मोदी का बोलत नाहीत? - जिग्नेश मेवाणी
पुण्यात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्ली : पुण्यात चिथावणीखोर भाषण केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल झाल्यानंतर गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. कोरेगाव भीमा प्रकरणावर मोदी काय बोलत नाहीत? असा सवाल त्यांनी यावेळी केला.
‘मी चिथावणीखोर भाषण केलं नाही’
नवी दिल्लीत आज पत्रकार परिषद घेऊन त्यांनी या प्रकरणावर आपलं मत व्यक्त केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ‘मी कोणतही चिथावणीखोर भाषण केलं नाही. माझ्या भाषणातील एकही शब्द चिथावणीखोर नव्हता. यात मला मुद्दाम गोवन्यात येत आहे, असे सांगत कोरेगाव भीमा प्रकरणावर मोदी काय बोलत नाहीत? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
ते म्हणाले की, ‘संघ परीवाराने सदस्य आणि भाजपमधील काही लोक माझी प्रतिमा डागाळण्याचा बालिश प्रयत्न करीत आहेत. हा गुजरात निवडणुकीच्या निकाला इफेक्ट आहे. तसेच त्यांना २०१९ मध्ये काय होईल याची भीती आहे.
युवा हुंकार रॅली
नवी दिल्लीत युवा हुंकार रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं सांगत ते म्हणाले की, ‘संविधान आणि मनुस्मृती घेऊ पंतप्रधान मोदींची भेट घेणार आहे.