Covid-19 : महिलांपेक्षा पुरूषांना कोरोना व्हायरसचा सर्वाधिक धोका
देशात कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृतांमध्ये ६५% पुरूषांचा समावेश
मुंबई : कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकारने विद्यार्थी, मजूर, पर्यटक आणि तीर्थक्षेत्रात गेलेल्या नागरिकांना आपापल्या राज्यांत जाण्याची परवानगी दिली आहे. यादरम्यान अनेक राज्यांना याबाबत अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. याबाबतची माहिती गृहमंत्रलयाचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी दिली आहे.
आपापल्या राज्यांत जाणाऱ्या लोकांची स्क्रिनिंग होणार आहे. असा प्रोटोकॉल काढून त्याचं पालन करण्यास सांगितलं आहे. तसेच सर्व नागरिक आपापल्या राज्यात बसमधून जाणार असल्याची देखील माहिती दिली. याकरता प्रत्येक राज्यांना एकमेकांची मदत करण आवश्यक ठरणार आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोनाबाधितांच्या फक्त मृत्यूचं प्रमाण वाढलं असं नाही तर यातून ठणठणीत बऱ्या होणाऱ्या रूग्णांची संख्या देखील जास्त आहे. देशात मृतांची टक्केवारी ही ३.२ इतकी आहे. यामध्ये ६५% पुरूषांचा समावेश असून ३५% महिलांचा समावेश आहे. गेल्या ११ दिवसांमध्ये याचं प्रमाण वाढत आहे. या ११ दिवसांत कोरोनामुळे ज्याच निधन झालं त्यामधील ७८% लोकांना अगोदर कोणता ना कोणता त्रास होता.
कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येतील दुप्पट वाढ ही ११ ते २० दिवसांच्यामझ्ये झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेला हा लॉकडाऊन ३ मे रोजी संपणार आहे. यानंतर सरकारकडून कोणते निर्णय घेतले जातील याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.
कोरोना व्हायरसचा होणारा त्रास हा स्त्री-पुरूषांना समान आहे. मात्र कोरोनामुळे सर्वाधिक त्रास पुरूषांना होऊन यामध्ये मृतांचा समावेश महिलांपेक्षा पुरूषांचा जास्त आहे. यामुळे या काळात पुरूषांची सर्वाधिक काळजी घेणं गरजेच आहे. त्याचप्रमाणे रक्तदाब किंवा मधुमेहाचा त्रास असणाऱ्या व्यक्तींनी सर्वाधिक काळजी घेणं गरजेचं आहे.
जानेवारीच्या सुरूवातीपासून याकडे लक्ष दिले जात आहे. देशात आतापर्यंत महिलांपेक्षा पुरूषांच कोरोनामुळे मृत्यू होण्याची संख्या जास्त असून याचे प्रमाण ६५% आहे.