Navratri Garba: संपूर्ण देशात 3 ऑक्टोबरपासून नवरात्रोत्सव सुरू झाला आहे. अहमदाबादच्या एका शहरात अनोखी प्रथा अजूनही पाळली जाते. सादु माता नी पोलमध्ये दरवर्षी नवरात्रीच्या आठव्या दिवशी 200 वर्षे जुनी प्रथा अजूनही पाळली जाते. यात बारोट समाजातील पुरुष साडी नेसून गरबा खेळतात. असं म्हटलं जातं की एका शापामुळं येथे ही प्रथा पाळली जाते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्थानिक कथांनुसार, ही परंपरा 200 वर्षांपूर्वी सुरू झाली होती. जेव्हा सादुबेन नावाच्या एका महिलेने बारोट समाजातील पुरुषाकडे मुगल सरदारापासून सुरक्षा मागीतली होती. हा मुगल सरकार या महिलेला कैद करण्याच्या विचारात होता. मात्र दुर्दैवाने या समाजातील पुरुष तिला वाचवू शकले नाही. यामुळं महिला तिच्या मुलापासून दुरावली गेली. दुखावून तिने पुरुषांना शाप दिला की त्यांच्या वंशजांचा सती होण्याआधीच मृत्यू होईल. सादु माता नी पोल जिथे 1000 हून अधिक रहिवासी राहतात. अष्टमीच्या दिवशी संपूर्ण गाव एकत्र येतो. 


गावात एक पारंपारिक वातावरण असते. जिथे लोक मोठ्या संख्येने जमतात आणि पुरुष साडी नेसून शेरि गरबाच्या तालावर नाचतात. हे एक सांस्कृतिक लोकनृत्याचा प्रकार आहे. सादु माताच्या सन्मानासाठी आणि शाप मिटवण्यासाठी एक मंदिर बनण्यात आलं आहे. प्रत्येक वर्षी प्रायश्चित्त म्हणून या समाजाचे पुरुष साडी नेसून गरबा खेळतात. आयएएनएसने दिलेल्या माहितीनुसार, हे परंपरा शहरातून आलेल्या प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करते. जे ही परंपरा पाहण्यास आणि भक्ती प्रदर्शन पाहण्यास उत्सुक असतात. 



तसं पाहायला गेलं तर, महिलांचे कपडे परिधान करणे हे अनेक पुरुषांसाठी आव्हान असतं. मात्र या समाजातील पुरुष मोठ्या आस्थेने आणि सन्मानपूर्वक साडी नेसून या परंपरेत सहभागी होतात. ही प्रथा फक्त प्रायश्चित्त म्हणून नव्हे तर सादु माताने दिलेल्या आशीर्वादाचा सन्मान करण्यासाठीही पाळली जाते. 


दरम्यान, ही परंपरा शाप मिटवण्यापर्यंतच सिमित नाहीये तर येथील लोक देवीचा सन्मानदेखील या अनोख्या पद्धतीने करतात. असं म्हणतात की, ही देवी या समाजाचा गेल्या कित्येक वर्षांपासून सुरक्षा करते व त्यांना आशीर्वाद गेते. नवरात्रीच्या दिवसांत पोल एक भक्तीस्थळ बनून जाते. येथे रंगीत साड्यात सजलेले प्रत्येत वयाचे पुरुष येथे सहभागी होतात.