लखनऊ : सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हाला रोटी खाण्याची इच्छाच होणार नाही. याचं कारण म्हणजे हा तरुण ज्या पद्धतीनं रोटी बनवतोय ते खूपच किळसवाणं आहे. याआधी मेरठमधील असाच एक व्हिडीओ समोर आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा तरुण रोटी तयार करताना थुंकीचा वापर करत आहे. थुंकीचा वापर करून रोटी करतोय. हा किळसवाणा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या वेगानं व्हायरल होत आहे. ढाब्यावर रोटी तयार करताना तो थुंकीचा वापर करत असल्याचं दिसत आहे.


व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ उत्तर प्रदेशातील लखनऊ इथल्या एका ढाब्यावरचा असल्याचं सांगितलं जात आहे. ढाब्यावर आलेल्यांपैकी एकाने हा व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद केला. हा व्हिडीओ व्हायरल होताच या प्रकरणाची पोलिसांकडून दखल घेण्यात आली. 



हा व्हिडीओ काकोरी इथल्या इमाम अली हॉटेलचा असल्याचं सांगितलं जात आहे. या व्हिडीओमध्ये एक व्यक्ती तंदूर रोजीवर थुंकताना आणि रोटी तयार करताना दिसत आहे. 


या व्हिडिओवरून पोलिसांनी कारवाई केली असून काकोरी पोलिसांनी हॉटेल मालक याकुब आणि त्याच्या चार कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले . सध्या या व्हायरल व्हिडीओप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत.या पूर्वी मेरठमधून असाच एक व्हिडीओ समोर आला होता.