इंदूर : सध्या बाजारात टोमॅटोचे दर गगनाला भिडलेत. टोमॅटोला सोन्याचा भाव मिळतोय. त्यामुळे भाजी विक्रेत्यांना मात्र टोमॅटो चोरीचे भय सतावतेय. मध्य प्रदेशमधील इंदूरमध्ये तर टोमॅटोच्या सुरक्षेसाठी सशस्त्र गार्ड तैनात करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजी बाजारात टोमॅटोच्या दरांनी शंभरी गाठलीये. त्यामुळे टोमॅटो चोरीचे प्रमाणही वाढलेय. दोन दिवसांपूर्वीच मुंबईतल्या एका भाजीबाजारातून तब्बल ३०० किलो टोमॅटो चोरी झाल्याची घटना घडली होती. त्यामुळेच इंदूरमधील या व्यापाराने टोमॅटोच्या सुरक्षेसाठी चक्क सशस्त्र गार्ड तैनात केलाय.