Work From Home तुमच्या घरीही असंच चित्र आहे का?
`असे हाल फक्त लग्नानंतरच होतात`, या फोटोमुळे महिला-पुरुषांत सुरू झालं भांडण
मुंबई: कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी अनेक ठिकाणी अजूनही वर्क फ्रॉम होम कर्मचाऱ्यांना देण्यात आलं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम दिलं होतं. मात्र आता ही मुदत वाढवण्यात आली आहे. वर्क फ्रॉम होममुळे घरात काम करताना काय अवस्था होते हे सांगणारे मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
लग्न झालेल्या पुरुषांनाही घरातील कामं करावी लागत आहेत. वर्क फ्रॉम होमसोबतच घरातील कामं करावी लागत असल्याने पत्नी-आई किती काम करते याची जाणीव त्या निमित्ताने झाल्याचं सोशल मीडियावर व्हिडीओ फिरत आहेत. तर काही मजेशीर व्हिडीओही समोर आले आहेत. असाच एक फोटो सोशल मीडियावर फिरत आहे.
या फोटोमध्ये वर्क फ्रॉम होम करणारा कर्मचारी अर्ध्या कपड्यांमध्ये बसला आहे. एकीकडे काम तर दुसरीकडे भाजी चिरताना दिसत आहे. या फोटोवर सोशल मीडियावर युझर्सनी तुफान कमेंट्स केल्या आहेत. काही युझर्स तर चक्क लग्नानंतर नवऱ्याची अशी अवस्था होते अशा पद्धतीच्या कमेंट्स केल्याचं पाहायला मिळत आहे.
महिलांनी मात्र या फोटोवर पुरुष मल्टिटास्कर बनल्याचं सांगत आहेत. @scribe_prashant नावाच्या युझरने 21 ऑगस्टला हा फोटो शेअर केला आहे. घरकाम आणि घरातून काम एकसाथ चालू असतं असं कॅप्शन देऊन हा फोटो शेअर करण्यात आला आहे. ही गोष्ट मजेची नाही. आई-बहीण आणि पत्नी या गोष्टी करतात कोरोना नसतानाही असं एका युझरने म्हटलं आहे. माझ्या आईने गेले 40 वर्ष हेच काम केल्याचं दुसऱ्या युझरने म्हटलं आहे. त्यामुळे यामध्ये मजेची गोष्ट काय असा प्रश्नही विचारला आहे. तरुणाने वर्क फ्रॉम होम करत घरकाम करणं म्हणजे मजेची गोष्ट का असंही काहींनी विचारलं आहे. तर काही युझर्सनी यावर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत.