मुंबई : Amul price Hike:अमूलने  (Amul) दुधाच्या दरात वाढ घोषित केली आहे. १ जुलैपासून अमूल दूध देशभरात दोन रुपयांनी महाग झाले आहे. गुजरात, दिल्ली-एनसीआर, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रासह अन्य राज्यांत नवीन दर लागू करण्यात आले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अन्न पदार्थांच्या किंमती वाढवल्यानंतर अमूलने आता दुधाच्या किंमती वाढविल्या आहेत. आता सर्वसामान्यांना दुधासाठीही जास्त खर्च करावा लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुजरात मिल्क को-कोपरेटिव मार्केटिंग लिमिटेड (GCMMF)अमूलचे एमडी डॉ. आरएस सोधी म्हणाले की इनपुट आणि उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे हे पाऊल उचलले गेले आहे. देशात अमूल दुधाच्या किंमतीत प्रतिलिटर 2 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. आता अहमदाबादमध्ये अर्ध्या लिटर अमूल गोल्डची किंमत 30 रुपये आहे, अर्धा लिटर अमूल ताझा 24 रुपये असेल.


सर्व ब्रँडवर किंमत वाढविण्यात आली


वाढत्या इनपुट कॉस्टमुळे अमूल को-ऑपरेटिव्ह सोसायटीने दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने आपल्या सर्व ब्रँडमध्ये प्रतिलिटर 2 रुपयांची वाढ केली आहे. आजच्या वाढीमुळे आता अमूल गोल्डचे दर 58 रुपये प्रति लिटरपर्यंत गेले आहेत. याशिवाय अमूल शक्ती, अमूल ताजा, अमूल टी स्पेशल, अमूल स्लिम एन्ड ट्रीम दूध यामध्ये दोन रुपये प्रति लिटर वाढ करण्यात आली आहे.


या दुधाची किती किंमत  


1 जुलैपासून अहमदाबादमधील अमूल गोल्डचे दर 500 मिलीलीटर प्रती 29 रुपये, अमूल ताजाचे 500 मिली प्रती 23 रुपये आणि अमूल शक्तीचे दर 500 मिली प्रती 26 रुपये असतील. दोन लिटरच्या वाढीमुळे एमआरपीत 4 टक्के वाढ दिसून येते, जे सरासरी अन्नधान्य चलनवाढीपेक्षा खूपच कमी आहे.


याच्या किमतीत होणार वाढ


इतर उत्पादनांच्या किंमतीही वाढू शकतात. दुधाचे दर वाढल्यानंतर आता अन्य दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतींमध्येही वाढ होण्याची शक्यता आहे. पनीर, लोणी, तूप, ताक, लस्सी, आईस्क्रीमच्या किंमतीही वाढू शकतात.