मुंबई : Milk Price Hike :  आज 1 मार्चपासून अमूल दूध (Amul Price Hike) महागले आहे. लीटरमागे दोन रुपयांनी दर वाढविण्यात आले आहेत. आता आणखी एका मोठ्या कंपनीने दुधाच्या दरात वाढ केली आहे. अमूलच्या घोषणेनंतर दुग्धजन्य पदार्थ बनवणाऱ्या पराग मिल्क फूड्सनेही दरात वाढ करण्याची घोषणा केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पराग डेअरी गोवर्धन ब्रँड अंतर्गत विविध उत्पादने तयार करते. पराग डेअरीने गोवर्धन ब्रँडच्या दुधाच्या दरात लिटरमागे दोन रुपयांनी वाढ केल्याचे सांगितले आहे. वाढलेला दर आज 1 मार्चपासून लागू करण्यात आला आहे. उत्पादन खर्चात वाढ झाल्यामुळे ही किंमत वाढवण्यात आल्याचे कंपनीने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. (Milk Price Hike - After Amul Milk parag milk foods hikes milk prices )


 50 रुपये प्रतिलिटर गोवर्धन गोल्ड दूध


कंपनीने दरात वाढ केल्यानंतर आता गोवर्धन गोल्ड मिल्क 48 रुपयांऐवजी 50 रुपये लिटरने विकले जाणार आहे. याशिवाय गोवर्धन फ्रेश 48 रुपये प्रति लिटर असणार आहे.  


शेतकऱ्यांना मिळणार लाभ  


दरवाढीबाबत पराग मिल्क फूड्सचे अध्यक्ष देवेंद्र शहा म्हणाले की, पॅकेजिंग, लॉजिस्टिक आणि चारा यांच्या किमतीत वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तब्बल तीन वर्षांनंतर कंपनीकडून दरात वाढ करण्यात आली आहे. दरवाढीचा फायदा शेतकऱ्यांनाही दिला जाईल, असेही कंपनीने म्हटले आहे.


याआधी सोमवारी संध्याकाळी अमूलकडून दरवाढीची घोषणा करण्यात आली होती. 1 मार्चपासून किमतीत वाढ झाल्यानंतर अमूल गोल्डचे 500 मिली पॅकेट 30 रुपयांना, अमूल ताझा 25 रुपयांना आणि अमूल शक्तीचे 27 रुपयांना विकले जात आहे.