जयपूर : रिलायंस जिओचा डेटा लीक केल्याच्या आरोपाखाली नवी मुंबई पोलिसांनी मंगळवारी राजस्थानमधून एका युवकाला अटक केली आहे. ही कारवाई जिओच्या जवळपास १ कोटी २० लाख ग्राहकांची माहिती लिक केल्यानंतर करण्यात आली. जिओ कंपनीचा डेटा magicapk.com साईटवर लीक केल गेला होता. ज्याला रविवार रात्री काढण्यात आलं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी अटक केलेल्या युवकाचं नाव इमरान चिमप्पा असल्याचं बोललं जातंय. तो चुरू जिल्ह्यातील सूरजगडचा असल्याचं बोललं जातंय. नवी मुंबई पोलीस आणि मुंबई सायबर सेलने तो इंजीनियरिंगचा स्टूडट असल्याचं म्हटलं आहे. राजस्थान पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांना सोपवलं. त्यानंतर त्याला वाशीला आणण्यात आलं.


नवी मुंबई पोलीसचे जॉइंट कमिश्नर प्रशांत बुर्डे यांनी सांगितलं की, 'आम्ही अटक केलेल्या युवकाच्या ट्रांसिट रिमांडची मागणी केली आहे.'