मुंबई : मॉडेलिंग आणि सिनेमासृष्टीत आपला दबदबा निर्माण केलेल्या अभिनेत्रींना लोकसभेच जाण्याची संधी मिळणार आहे. पश्चिम बंगालमधून तीन अभिनेत्रींना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी मिळाली आहे. त्यापैकी एक अभिनेत्री याआधी लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेली आहे. त्यामुळे या तीन अभिनेत्रींना लोकसभेत जाण्याची संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाची लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर करताना ५ महिलांना लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली. यात नुसरत जहां, मिमी चक्रवर्ती आणि मुनमुन सेन यांचा समावेश आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आसनसोल येथून अभिनेत्री मुनमुन सेन, बीरभूममधून अभिनेत्री सताब्दी रॉय तर  नुसरत जहांला बशीरहट मतदारसंघातून लोकसभेच्या रिंगणात उतरविण्यात आले आहे.
मॉडेलिंगनंतर नुसरतने बंगाली सिनेसृष्टीत दबदबा निर्माण केला आहे. नुसरत जहांला तृणमूल काँग्रेसकडून रिंगणात उतरविण्यात आले आहे. नुसरत जहां - २०१० मध्ये मिस कोलकाताचा किताब जिंकून नुसरत जहांने मॉडेलिंगमध्ये पदार्पण केले.



मिमी चक्रवर्ती हिला पश्चिम बंगालमधील जादवपूर लोकसभा मतदारसंघातून आपले नशिब अजमवणार आहे. अभिनेत्री मिमी चक्रवर्ती टीव्ही सिरियल आणि सिनेमाच्या माध्यमातून मिमी चक्रवर्ती यांची लोकप्रियता घराघरात पोहोचली आहे. तर मुनमुन सेन याआधी खासदार आहे. बॉलीवूडसह, बंगाली, तमिळ, तेलगू आणि मराठी चित्रपटसृषटीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मुनमुन सेन तृणमूलकडून आसनसोल मधून निवडणूक लढवत आहे. या अगोदर २०१४ मध्ये मुनमुन सेनने बांकुरा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी तिचा पराभव झाला होता.