पटना : मंत्र्यांनाच जेव्हा खंडणी आणि जीवे मारण्याची धमकी मिळते तेव्हा राज्याची कायदा व सुव्यवस्था काय आहे हे लक्षात येते.


10 लाखाची खंडणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिहार हे गुन्हेगारीमध्ये तसा पुढेच आहे. पण येथे तर आता मंत्री देखील सुरक्षित नाहीत. राज्यातील ऊस मंत्री खुर्शीद आलम यांच्याकडे 10 लाखाची खंडणी मागण्यात आली आहे. जर 10 लाख नाही मिळाले तर त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.


जीवे मारण्याची धमकी


जेव्हा मंत्री खुर्शीद आलम यांना खंडणीचा मॅसेज आला तेव्हा त्यांनी त्यावर कोणताही रिप्लाय नाही दिला. त्यानंतर खंडणीखोरांनी त्यांना फोन करुन धमकावलं. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री खुर्शीद आलम यांनी सांगितले की, भोजपुरीमध्ये त्यांना फोन करुन एकाने मॅसेज पाहायला  सांगितला. त्यावर त्यांनी मी मॅसेज बघत नाही असं म्हटलं. त्यानंतर खंडणीखोरांनी 10 लाखाची मागणी करत अकाऊंट नंबर मॅसेज केला आहे. असं देखील सांगितलं. पैसे न मिळाल्यास त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.


पोलिसांची चोकशी सुरु


या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर पटना पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे. पटनाचे डीएसपी कायदा आणि सुव्यवस्था शिबली नोमणी स्वत: या प्रकरणाची चौकशी करत आहे.