केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपलटाचे वारे
येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या खांदेपालटचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेला पंतप्रधान कार्यालयानं सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीनंतर केंद्रीय मंत्रीपरिषदेचा विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक मंत्र्यालयात १ जून 2014 ते 31 मे 2017 या कालावधीत किती फाईल आल्या, आणि त्यावर नेमक्या किती कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली याची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयानं मागवली आहे.
नवी दिल्ली : येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्रिमंडळातल्या खांदेपालटचे संकेत मिळू लागले आहेत. केंद्रीय मंत्र्यांच्या कामाचा प्रगतीचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेला पंतप्रधान कार्यालयानं सुरुवात केली आहे. राष्ट्रपतीपदासाठीच्या निवडणूकीनंतर केंद्रीय मंत्रीपरिषदेचा विस्तार आणि खांदेपालट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्या अनुषंगानं प्रत्येक मंत्र्यालयात १ जून 2014 ते 31 मे 2017 या कालावधीत किती फाईल आल्या, आणि त्यावर नेमक्या किती कालावधीत कोणती कारवाई करण्यात आली याची तपशिलवार माहिती पंतप्रधान कार्यालयानं मागवली आहे.
नुकत्याच झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः याविषयीचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक मंत्रालयाला माहिती भरुन पाठण्यासाठी काही विशिष्ट तक्ते पाठवण्यात आले आहेत. त्यात पाच रकाने आहेत. त्यात ओपनिंग बॅलन्स, किती फाईल्स आल्या, एकूण किती फाईल्स निकाली काढल्या, किती फाईल्सवर कारवाई प्रलंबित आहे, अशी माहिती विचारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पंतप्रधानांकडे ईमेल किंवा माय गव्हच्या माध्यमातून ज्या तक्रारी येतात, त्या तक्रारी संबंधित मंत्रालयांकडे निवारणासाठी पाठवण्यात येतात. या तक्रारींच्या निवारणाचीही महिती पंतप्रधान कार्यालयानं विचारली आहे.