Crime News : मोबाईल गेम जिंकण्याची पैज हरल्यानंतर अल्पवयीन मुलाला तब्बल 200 चपलेचे जोडे मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  मात्र या 200 चपलांचे जोडे मारलेल्या मुलाची अवस्था गंभीर झाली असून त्याला रूग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेमकं काय घडलं?


पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यामधील पोटाशपूर या गावातील घटना आहे. गावापासून काही अंतरावर अल्पवयीन मुले मोबाईलवर गेम खेळत होती. गेम खेळताना त्यांनी पैज लावली की जो गेम हरेल त्याला 200 वेळा चपलेने मारायचं. यामध्ये एक मुलगा हरतो आणि त्याला पैजेनुसार त्याला 200 चपलेचे जोडे मारण्यात आले.


ज्यावेळी त्याला मारण्यात आलं तेव्हा तिथं काही झाले नाही, मित्रांसोबत खेळून तो आपल्या घरी परतला.घरी परतल्यावर त्याची प्रकृती बिघडली आणि नाकातून रक्त येऊ लागलं. त्यानंतर अल्पवयीन मुलाला कुटुंबियांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं. 


नाकातून रक्तस्त्राव झाल्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांकडून मुलाच्या कुटुंबियांना मेदिनीपूर मेडिकल कॉलेजमध्ये रेफर करण्यात आले. मुलं कोणती गेम खेळत होतीत याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.


दरम्यान, पालक आपल्या मुलांना मोबाईल देतात मात्र मुलं कोणत्या गेम खेळतात हे पाहत नाही. मागे ब्लू व्हेल या मोबाईल गेममुळे काहींनी आपलं जीवन संपवलं होतं. त्यामुळे पालकांनीही खबरदारी घ्यायला हवी.