अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता एका शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
भोपाळ : महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता एका शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
सागर जिल्ह्यातील धक्कादायक घटना
मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. गुरुवारी रात्री दोन युवकांनी आठवी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार केला.
अंगावर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न
यावेळी पीडित मुलीने आरडाओरड केल्यानंतर घाबरलेल्या आरोपींनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित तरुणी गंभीर जखमी झाली आहे.
पोलीस तपास सुरु
या प्रकरणी पोलिसांनी दोन तरुणांविरोधात तक्रार दाखल केली असून अधिक तपास सुरु आहे. घटना घडली त्यावेळी पीडित तरुणी घरात एकटी होती. तसेच आरोपी हे त्याच परिसरात राहणारे असल्याची माहिती समोर येत आहे.
पीडित तरुणी घरात एकटीच होती
पोलीस तपास करणारे अधिकारी महेंद्र सिंग धाकड यांनी सांगितले की, देवल गावात गुरुवारी रात्री पीडित तरुणी घरात एकटीच होती. त्यावेळी दोन तरुण आले आणि तिची छेड काढण्यास सुरुवात केली.
आरोपींचा शोध सुरु
पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला उपचाराकरीता सागर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.
पीडित मुलीच्या काकांनी सांगितले की, माझी पुतणी घरात एकटीच होती त्यावेळी दोन तरुण आले आणि त्याच्यासोबत गैरकृत्य केलं. त्यावेळी मुलीने आरडाओरड केल्यानंतर आरोपींनी तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिलं.