आईने मारल्यामुळे मुलीने केली आत्महत्या...
उत्तर प्रदेशातील भीमपुरा परिसरातील रामापट्टी तासपुर गावात राहणाऱ्या एका वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली.
बियान : उत्तर प्रदेशातील भीमपुरा परिसरातील रामापट्टी तासपुर गावात राहणाऱ्या एका वर्षांच्या मुलीने आत्महत्या केली. आईने मारल्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षक अनिल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार गुडीया (वय १५ वर्षे) हिने शनिवारी घरातच स्वतःला पेटवून दिले. शुक्रवारी बकरीला चारा देताना गुडीयाकडून काही चूक झाल्याने तिची आई तिला खूप ओरडली व मारले देखील.
मारल्यामुळे दुःखी झालेल्या गुडियाने स्वतःला एका खोलीत बंद करून घेतले आणि पेटवून दिले. हे प्रकरण पोलिसात जाऊन नये म्हणून घरातल्यांची ते दाबण्याचा प्रयत्न केला आणि मृतदेह घराच्या मागे गाडला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुडियाच्या मोठ्या बहिणीने तिची आई निशा, काका गणेश आणि आजोबा श्रवण यांच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केल्याने हे प्रकरण उघडकीस आले.
या प्रकरणी आई निशा हीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. त्याचबरोबर कुटुंबीयांची चौकशी देखील सुरु आहे.