जयपूर: देशातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा दिवसेंदिवस अधिकच बिकट होताना दिसत आहे. राजस्थानमध्ये घडलेल्या घटनेमधून हे पुन्हा एकदा पुढे आले. राजस्थानातील  झुनझुनू येथे एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. या वेळी नराधमांच्या तावडीतून सुटण्यासाठी आणि अब्रु वाचविण्यासाठी तिने थेट विहिरीत उडी घेतली.


आरोपी पळाले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एएनआय या वृत्तसंस्थेने देलेल्या वृत्तानुसार ही घटना सोमवारी (६ ऑगस्ट) घडली. पीडितने खोल विहिरीत उडी मारल्याने ती गंभीर जखमी झाली. सध्या तिच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पीडितेने केलेला आरडाओरडा आणि विहिरीत उडी मारल्याने नराधमांनी तेथून पळ काढला. त्यामुळे तिची अब्रु वाचली. मात्र, ती गंभीर दुखापत झाली.




गुन्हा दाखल, तपास सुरू


दरम्यान, आरडाओरडा ऐकून  परिसरातील नागरिक घटनस्थळावर दाखल झाले. त्यानंतर या नागरिकांनी मुलीला विहिरीबाहेर काढले आणि रूग्णालयात दाखल कले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, तपासही सुरू केला आहे. मात्र, अद्यापही आरोपी फरार आहेत.