Hanuman Idol Blinked Eyes: सोशल मीडियावर रोज कोणता कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. आता व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील प्रसिद्ध ओखलेश्वर धाम येथे मारुती मंदिर आहे. या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या श्रद्धेने येत असतात. या मंदिरात रोहिणी नक्षत्रात 27 व्या दिवशी मारुतीरायाचं श्रृंगार केला जाते. मात्र यावेळी करण्यात आलेल्या श्रृंगारावेळी मारुतीरायाने डोळ्याची उघडझाप केल्याचा दावा करण्यात येत आहे. या चमत्काराचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल व्हिडीओनंतर मंदिरात भाविकांची रिघ वाढली आहे. भक्तांसह मंदिरातील पुजाऱ्यांनी ही चमत्कारीक घटना असल्याचं सांगितलं आहे. काही जण हा व्हिडीओ आपल्या मोबाईलमध्ये कॅप्चर केल्याचा दावा करत आहेत. प्राचीन हनुमान मंदिरात अनेकवेळा अद्भूत घटना घडल्याचं देखील काही जण बोलत आहेत. आता डोळ्यांची उघडझाप केल्याच्या घटनेने लोकांना आश्चर्य वाटले आहे. ओखलेश्वर धाममध्ये नुसत्या देवाच्या दर्शनाने प्रत्येक मनोकामना पूर्ण होते अशी लोकांची समज आहे.



ओखलेश्वर धाममध्ये हनुमान जयंतीसह एका वर्षात 13 वेळा मारुतीरायाचा श्रृंगार केला जातो . हजारो भाविक श्रृंगारावेळी दर्शनासाठी येतात. व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार, शनिवारी संध्याकाळी मारुतीच्या मूर्तीची सजावट केली जात असताना अचानक डोळ्यांची उघडझाप केल्याचं सांगितलं जात आहे. झी 24 तास या व्हायरल व्हिडीओला दुजोरा देत नाही.