`या` राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये लिहिली १३ पुस्तकं
या काळात त्यांनी १३ पुस्तकं लिहून काढलीयत.
नवी दिल्ली : राज्यपाल हे राज्यातील सर्वोच्च पद असत. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक, समाजकारणापासून राजकारणापर्यंतच्या सर्वच क्षेत्र त्यांच्या जवळून परिचयाची असतात. राज्यात अडचणीच्या प्रसंगात असताना राज्यपालांच्या दालनात धाव घ्यावी लागते. सध्या लॉकडाऊनमुळे सर्वांचेच वेळापत्रक बदललंय. अशा स्थितीत मिझोरामचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांनी वेळ काढत स्वत:चा आदर्श देशासमोर ठेवलाय. कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. या काळात त्यांनी १३ पुस्तकं लिहून काढलीयत.
आपल्याकडे असलेल्या रिकामी वेळाचा सदुपयोग त्यांनी पुस्तकं लिहिण्यासाठी केलायं. मार्चपासून आतापर्यंत त्यांनी इंग्रजी तसेच मल्याळम भाषांमध्ये कवितासंग्रह देखील लिहिले.
कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर राजभवनात कोणाला यायला परवानगी नव्हती. लोकांशी माझा थेट संबंध येत नव्हता. तसेच माझा प्रवास दौरा देखील काही काळासाठी रद्द करण्यात आला होता. यामुळे त्यांना पुस्तकं वाचन आणि लिखाणासाठी वेळ मिळाल्याचे ते सांहतात.
मी सकाळी ४ वाजता उठायचो आणि व्यायाम केल्यानंतर वाचायला, लिहायला सुरुवात करायचो. राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांना लोकांमध्ये वावरताना पुस्तकं वाचनाची आवड असली पाहीजे असे ते सांगतात. राज्यपाल पिल्लई हे लहानपणापासून सर्वसाधारण आयुष्य जगत आलेयत. तसेच ग्रामीण राजकारणात सक्रीय राहीलेयत. वकीलीचे शिक्षण घेताना ग्रामीण जनतेसोबत ते एकरुप झाल्यानंतर ते राजकीय क्षेत्रात आले.
कोरोना वायरसने जगावर खूप वाईट परिणाम झाले. पण याची एक सकारात्मक बाजु देखील आहे. वायरसने आपल्या मानवता शिकवल्याचे पिल्लई सांगतात. आपण एकमेकांवर किती अवलंबून राहतो आणि माणुसकी दाखवतो हे यात पाहायला मिळाले.
मिझोरामचे मुख्यमंत्री जोरामथंगा शनिवारी एका कार्यक्रमात राज्यपालांच्या काही पुस्तकांचे प्रकाशन करतील. पिल्लई यांनी साधरण ३० वर्षांपुर्वी लिहायला सुरुवात केली. राज्यपाल बनण्याआधी त्यांची १०५ पुस्तकं प्रकाशित झाली होती. विविध क्षेत्रात त्यांनी आतापर्यंत १२१ पुस्तकं लिहिली आहेत.