चेन्नई : डीएमकेचे संस्थापक करुणानिधी यांच्या निधनानंतर तमिळनाडूमध्ये डीएमकेचं प्रमुख पद 49 वर्षानंतर बदललं आहे. करुणानिधी यांचा मुलगा एम.के स्टालिन यांना अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. त्यामुळे पक्षात सुरु असलेला वर्चस्वाच्या वादाला देखील पूर्णविराम लागला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंगळवारी पक्षाच्या बैठकीत डीएमकेचे कार्यकारी अध्यक्ष आणि दिवंगत एम करुणानिधी यांचा मुलगा एमके स्टालिन यांना पक्षाचा अध्यक्ष बनवण्यात आलं आहे. वरिष्ठ नेते आणि पक्षाचे सचिव दुरईमुरुगन यांनी पक्षाचा कोषाध्यक्ष बनवण्यात आलं आहे.


चेन्नईमधील डीएमके मुख्यालयात आज ही पक्षाची बैठक झाली. स्टालिन अध्य़क्ष झाल्यानंतर समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला. अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर स्टालिन यांनी समर्थक आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. डीएमकेच्या या बैठकीत तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी यांना भारतरत्न देण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला.


स्टालिन यांच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर काँग्रेस अध्‍यक्ष राहुल गांधी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.