लखनौ : उत्तर प्रदेशातील समाजवादी पक्षाचे आमदार बुक्कल नवाब यांनी भाजप प्रवेश केला आहे, तसेच बुक्कल नवाब हे अयोध्येतल्या श्रीराम मंदिरासाठी १० लाख रूपयांची देणगी देणार आहेत . 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एवढंच नाही तर श्रीरामाच्या मूर्तीसाठी सोन्याचा मुकुट भेट देऊ असंही यावेळी बुक्कल नवाब यांनी म्हटले आहे. 


बुक्कल नवाब यांच्यासह ठाकूर जयवीर सिंह जे समाजवादी पार्टीचे आमदार आहेत, त्यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर बुक्कल नवाब यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 


एवढंच नाही तर बुक्कल नवाब यांनी अखिलेश यादव मुख्यमंत्री असताना मुस्लिम समाजावर अन्याय झाले, असं म्हटलं आहे. श्रीरामाचं मंदिर अयोध्येत उभं राहिलंच पाहिजे अशी आग्रही भूमिकाही बुक्कल नवाब यांनी यावेळी घेतली.