नवी दिल्ली :  GST अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्स कर लावण्यात आलाय. सॅनिटरी नॅपकिनवरील टॅक्स रद्द करावा, या मागणीसाठी मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी वित्त मंत्री अरूण जेटली यांची भेट घेतली. सीएसआर निधीतून सॅनिटरी नॅपकिन पुरवण्यावर भर देण्याची त्यांनी यावेळी मागणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शालिनी ठाकरे यांनी दिल्ली येथे वित्तमंत्री अरुण जेटली यांची भेट घेऊन GST अंतर्गत सॅनिटरी नॅपकिन्सवर आकारण्यात आलेल्या कराबद्दल चर्चा केली. महिलांना महिला असल्याचा कर भरवा लागत आहे. सॅनिटरी नॅपकिन्स विषयी जागरूकता पसरवण्याधी ते सर्वांसाठी उपलब्ध होणं गरजेचं आहे. पण कित्येक महिला या मूलभूत हक्कापासून वंचित आहेत, असे जेटली यांच्या निदर्शनास आणून दिले.


सॅनिटरी नॅपकिन्स उत्पादकांसाठी CSR अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी व्हेंडिंग मशिन्स व वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट लावण्यासाठी विल्हेवाट यंत्र लावणे बंधनकारक करण्याचा लक्षात आणून दिले.
हे अतिशय महत्वाचे मुद्दे असून केंद्र तसेच राज्य सरकार यात लक्ष देईल, असे आश्वासन वित्तमंत्री अरुण जेटली यांनी दिल्याचे शालिनी ठाकरे यांनी सांगितले.