नवी दिल्ली : विमानांची वाहतूक सुरू असताना विमानतळाच्या धावपट्टीवर फोटोशूट करून स्टंट करणाऱ्या नऊ मॉडल्सचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडिओ कोणत्या विमानतळाचा आहे याबद्दल मात्र माहिती मिळालेली नाही. परंतु, या स्टंटबाजीच्या घटनेची चौकशी करण्याचे आदेश हवाई वाहतूक महासंचालकांनी (डीजीसीए) दिलेत.


सोशल मीडियावरून हा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नऊ मॉडल्स विमानतळाच्या धावपट्टीवर उभे राहून हा व्हिडिओ शूट करताना यामध्ये दिसत आहेत. त्याचवेळेस पाठून एक टर्बोप्रॉप विमान त्यांच्या डोक्यावरून उडतानाही या व्हिडिओत दिसतंय... हे विमान अचानक या मॉडल्सच्या डोक्यावरून गेल्यानंतर त्या खाली वाकलेल्याही या व्हिडिओत दिसत आहे.   


या व्हिडिओत एका मॉडेलचा आवाज स्पष्टपणे ऐकू येतोय. 'आपल्यासाठी हे एक खाजगी विमान आलंय' असं म्हणताना मॉडेलचा आवाज ऐकू येतोय.