मुंबई : लग्नसराईत काय काय किस्से घडतील याचा काही नेम नाही. असाच एक किस्सा सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत वधु - वर नाही तर चक्क भटजींनीच हटके प्रकार केला आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून लग्नाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र हा व्हिडिओ थोडा खास आहे. कारण यामध्ये भटजीने जो प्रकार केलाय तो वाखाण्याजोगा आहे. 


नेमकं काय केलं भटजीने?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


भटजीने या व्हिडिओ 7 फेरे घेताना अजब प्रकार केलाय. भटजीने मंत्र पठणाबरोबरच फिल्मी बॉलिवूड गाणी गायली आहेत. त्यामुळे या नववधु -वराला तर आश्चर्याचा धक्का बसलाच पण हा प्रकार आपल्या लग्नात घडला याचं देखील त्यांना नवल वाटत आहे. नव दाम्पत्यासोबतच लग्नाला उपस्थित असलेली सर्व मंडळी थोडी आश्चर्यचकित झाली आहेत. 


या व्हिडिओत त्या भटजीने हाथ मैं मेरे, हाथ हो तेरा.... , धीरे धीरे मेरे जिंदगी मैं आना.... यासारखी गाणी गाऊन या भटजीने सगळ्यांना सुखद धक्का दिला आहे. हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत जरूर पाहा. हा व्हिडिओ कुठचा आहे याची अद्याप माहिती मिळालेली नाही. पण या व्हिडिओला भरपूर पसंती मिळत आहे.