मोदी सरकारचे युवा कॅबिनेट, 35 वर्षांचा हा नेता सर्वात तरुण चेहरा
Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर आणि विस्तारानंतर नव्या मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तारात सरासरी कमी झाले आहे. यंग मंत्रिमंडळ दिसून येत आहे.
मुंबई : Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाच्या फेरबदलानंतर आणि विस्तारानंतर नव्या मंत्रिमंडळ (Cabinet Expansion) विस्तारात सरासरी वय 61 वर्षांवरून 58 वर्षांपर्यंत खाली आले आहे. 35 वर्षीय निशित प्रमानिक (Nisith Pramanik) हे पश्चिम बंगालमधील कूचबिहारचे (Cooch Behar) खासदार असलेले मंमंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री आहेत. तसेच सर्वात ज्येष्ठ सदस्य सोम प्रकाश हे 72 वर्षांचे आहेत.
मोदी यांच्या मंत्रिमंडळात आता 77 मंत्री आहेत. त्यातील 73 भाजप व उर्वरित 4 मंत्री अपना दल, जनता दल (सं), लोक जनशक्ती आणि रिपब्लिकन पक्ष या घटक पक्षांचे आहेत. मोदी यांचे नवे मंत्रिमंडळ पूर्वीच्या तुलनेत अधिक तरुण आहेत. महिला, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती, जाट, मराठा समाजाला प्रतिनिधित्व देण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उत्तर प्रदेशला सर्वाधिक 7 तर, महाराष्ट्राला 4 नवी मंत्रिपदे देण्यात आली आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात 25 राज्यांना प्रतिनिधित्व मिळाले आहे.
सर्वात तरुण मंत्रिमंडळ
पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखालील नवीन मंत्रिमंडळात 77 सदस्य आहेत. 50 वर्षांखालील इतर मंत्र्यांमध्ये स्मृती इराणी (45 वर्षे), किरेन रिजिजू (49 वर्षे), मनसुख मंडावीया (49 वर्षे), कैलास चौधरी (47 वर्षे), संजीव बाल्यान (49 वर्षे), अनुराग ठाकूर (46 वर्षे), डॉ भारती प्रवीण पवार (42 वर्षे), अनुप्रिया सिंह पटेल (40 वर्षे), शांतनु ठाकूर (38 वर्षे), जॉन बार्ला ( 45 वर्षे) आणि डॉ. एल मुरुगन ( 44 वर्षे) यांचा समावेश आहे.
सरासरी वय 61 वरून 58 पर्यंत कमी
केंद्रीय मंत्रिमंडळात बुधवारी झालेल्या महत्त्वपूर्ण फेरबदल आणि विस्तारात 43 मंत्र्यांनी शपथ घेतली. यापूर्वी डॉ. हर्षवर्धन, रमेश पोखरियाल निशंक, रविशंकर प्रसाद, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक मंत्र्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.
माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते सर्बानंद सोनोवाल यांच्याशिवाय शपथ घेणाऱ्यांमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया, नारायण राणे, भूपेंद्र यादव इत्यादींचा समावेश आहे. त्याचवेळी, जी किशन रेड्डी, पुरुषोत्तम रुपाला, अनुराग ठाकूर, हरदीपसिंग पुरी, मनसुख मंडावीया, आरके सिंह, किरेन रिजिजू यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
नवे कॅबिनेट मंत्री
नारायण राणे (महाराष्ट्र), सर्वानंद सोनोवाल (आसाम), डॉ. वीरेंद्र कुमार (मध्य प्रदेश), ज्योतिरादित्य सिंधिया (मध्य प्रदेश), अश्विनी वैष्णव (ओडिशा), भूपेंद्र यादव (राजस्थान), रामचंद्र प्रताप सिंह (जनता दल-संयुक्त-बिहार), पशुपती पारस (लोक जनशक्ती-बिहार)