देशभरात ७५ वैद्यकीय महाविद्यालय उघडणार, कॅबिनेटचा निर्णय
देशभरात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाणार
नवी दिल्ली : देशभरात ७५ नवीन वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले जाणार असून यासाठी २४ हजार कोटी रुपये खर्च करणार असल्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला आहे. यामध्ये १५ हजार जागा निर्माण होणार असून ग्रामीण भागांना प्राथमिकता दिली जाणार आहे. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी यासंदर्भात माहीती दिली. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेण्यात आल्याची चर्चा या घोषणेनंतर होत आहे.
ज्या जागेत अद्याप वैद्यकीय महाविद्यलये नसतील तिथे प्राधान्य देण्यात येणार असून २०२०-२१ पर्यंत ही महाविद्यालये उभारली जाणार आहेत. तसेच ६० लाख मेट्रिक टनसाठी ऊस निर्यातीसाठी सबसीडी दिली जाणार असल्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. हे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जाणार आहेत.