नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी यांच्या कॅबिनेटची आज महत्त्वाची बैठक सकाळी 11:30 वाजता होणार आहे. बैठकीत सरकार कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणावर मोठा निर्णय घेऊ शकते. सरकार पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय घेऊ शकते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पॉक्सो कायद्यात बदल करण्याचा निर्णय झाला तर 12 वर्षाखालील चिमुरडींवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा होऊ शकते. सध्या पॉक्सो कायद्यात दोषीला कमीत कमी 7 वर्ष ते आजीवन कारावासाची शिक्षा होते.


पीएम मोदींनी लंडनमध्ये भारत की बात सबके साथ कार्यक्रमात देशातील वाढत्या बलात्काराच्या घटनांवर चिंता व्यक्त केली. सरकार आता याविरोधात कडक पाऊलं उचलण्याच्या तयारीत आहे. आज कॅबिनेटच्या बैठकीत एससी/एसटी कायद्याबाबत ही सरकार काही महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. यानंतर सरकारला आपल्याच पक्षातील काही नेत्यांची नाराजी देखील सहन करावी लागेल.