लग्नाच्या २६ वर्षानंतर मोदींनी दिला पत्नीला घटस्फोट...
सर्वात महागड्या ठरलेल्या घटस्फोटांपैंकी हे एक प्रकरण...
अहमदाबाद : सध्या देशातील एक घटस्फोट चर्चेचा विषय ठरलाय. आत्तापर्यंतच्या सर्वात महागड्या ठरलेल्या घटस्फोटांपैंकी हे एक प्रकरण म्हणून चर्चेत आहे. देशातील आघाडीची औषध निर्माता कंपनी कॅडिला फार्मास्युटिकल्सचे अध्यक्ष सह-व्यवस्थापकीय संचालक राजीव मोदी यांनी मोठी किंमत चुकवून आपल्या पत्नीला घटस्फोट दिलाय. मुंबईच्या गरवारे पोलिएस्टर लिमिटेडच्या मालकांची मुलगी मोनिका गरवारे ही त्यांची पत्नी... राजीव मोदी आणि मोनिका गरवारे यांचा घटस्फोटाचा अर्ज अहमदाबादच्या कौटुंबिक न्यायालयानं परवानगी दिलीय.
राजीव-मोनिका या दाम्पत्याला १७ वर्षांचा एक मुलगाही आहे. गेल्या २६ वर्षांपासून त्यांचं वैवाहिक जीवन शांततेनं सुरू होतं... परंतु, आता मात्र त्यांचं नातं भंगलंय... दोघांनी परस्पर संमतीनं हा निर्णय घेतलाय. पण त्यांचा हा खाजगी विषय चव्हाट्यावर आला तो पोटगीपोटी दिलेल्या रकमेमुळे...
राजीव - मोनिका यांनी १९९२ साली विवाह केला होता. ३० ऑगस्ट रोजी मोनिकानं आपल्या पतीवर प्रतारणा आणि मारहाणीचा आरोप केला होता... मोनिकानं याची तक्रार पोलिसांतही नोंदवली होती.
यानंतर त्यांचं नातं आणखीनच बिनसलं... आणि दोघांनी परस्पर संमतीनं घटस्फोटाचा निर्णय घेतला. या घटस्फोटासाठी राजीव मोनिकाला २०० करोड रुपये पोटगीपोटी देणार आहे... तर मुलाची जबाबदारी वडिलांकडे राहील.