नवी दिल्ली :  अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम (dawood ibrahim) च्या मुसक्या आवळण्याची जबाबदारी गृह मंत्रालयाने आता NIA कडे दिली आहे. नॅशनल इंवेस्टिगेशन एजेंसी (NIA) दहशतवादाची चौकशी करणारी सर्वात मोठी संस्था आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएला ही मोठी जबाबदारी सोपवण्याची ही पहिलीच वेळ आहे. दाऊद इब्राहिमच्या मुसक्या आवळण्यासाठी एनआयएकडून देखील आता जोरदार तयारी सुरु झालीये.


काही काळापूर्वी दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ अनीस इब्राहिम भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची बातमी आली होती. अनीस इब्राहिम हा अंमली पदार्थांच्या तस्करीत गुंतलेला आरोपी असून तो सध्या त्याचा व्यवसाय दुबईतून हाताळत आहे.


एनआयएला अभूतपूर्व शक्ती


आतापर्यंत ईडी दाऊदशी संबंधित प्रकरणांचा तपास करत होती. पण आता एनआयएकडेही ती ताकद आहे की ती परदेशात जाऊन कारवाई करू शकते. गृह मंत्रालयाने डी कंपनीशी संबंधित सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची जबाबदारी सर्वात मोठ्या तपास यंत्रणेकडे सोपवली आहे.


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर कारवाई करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक नवीन योजना तयार केली असून त्याअंतर्गत दाऊद इब्राहिमशी संबंधित प्रकरणांच्या तपासाची जबाबदारी एनआयएकडे देण्यात आली आहे.


UAPA अंतर्गत गुन्हे दाखल


दाऊद इब्राहिम, डी कंपनी आणि त्याच्या प्रत्येक साथीदाराविरुद्ध UAPA अंतर्गत खटले आधीच दाखल आहेत. आता एनआयएही याअंतर्गत पुढील कारवाई करणार आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, डी कंपनी आणि दाऊद इब्राहिम टेरर फंडिंग, नार्को टेरर, ड्रग्स स्मगलिंग आणि फेक करन्सी (एफआयसीएन) मध्ये व्यापार करून भारतात दहशत पसरवण्याचे काम करत आहेत.


इतकेच नाही तर दाऊद इब्राहिम आणि त्याची डी कंपनी लष्कर-ए-तैयबा (एलईटी), जैश-ए-मोहम्मद (जेएम) आणि अल कायदाच्या माध्यमातून भारतात दहशतवादी कारवाया करत आहेत.