नवी दिल्ली : मोदी सरकार पेंशन धारकांना मोठी आनंदवार्ता देणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकार एम्प्लॉई पेंशन स्कीमच्या अंतर्गत मिळणाऱ्या मूळ राशीत दुप्पट वाढ करणार आहे. कर्मचारी भविष्य निधी संगठन म्हणजे ईपीएफओच्या अंतर्गत ईपीएस सब्सक्रायबर्सच्या मासिक पेंशनला दुप्पट करून 2 हजार रुपये केली जाऊ शकते. याचा फायदा जवळपास 40 लाख सब्सक्रायबर्सला मिळणार आहे. मात्र सरकारवर 3000 करोड रुपयांचा बोझा वाढणार आहे. याचा अंतिम निर्णय पुढच्या वर्षी निवडणुकीच्या अगोदर होणार आहे. 


सरकारवरील बोझा देखील वाढणार 


इकोनॉमिक टाइम्सच्या माहितीनुसार, सरकार पेंशन दुप्पट करण्याच्या तयारीत असेल तर ही पेंशनधारकांसाठी खुशखबरच आहे. कॅबिनेट 2014 मध्ये एका वर्षासाठी 1 हजार रुपये मासिक पेंशन धारकांना मंजूरी दिली होती. 2015 मध्ये त्याला वाढवण्यात आलं. न्यूनतम पेंशनसाठी सरकार दरवर्षी 813 करोड रुपयाचं योगदान देत आहे. 


ईपीएफओ या योजनेवर करत आहे काम 


वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने ईपीएफओच्या योजनेत काम करण्यात सांगितलं आहे. 


90 हजार भरणार सरकार 


ईपीएफ 95 स्कीमच्या अंतर्गत 60 लाख पेंशनर्स आहेत. यामध्ये 40 लाखच्या 1500 रुपयात कमी पेंशन मिळणार आहे. यामधील 18 लाख न्यूनतम  हजार रुपये पेंशन योजनेंतर्गत फायदा मिळणार नाही. सरकारच्या 3 लाख करोड पेंशन फंड आणि ईपीएसच्या अंतर्गत 9 हजार करोड रुपये देणार आहेत.