नवी दिल्ली : मोदी सरकारने खासगी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आणली आहे. सोबतच मॅटरनिटी लिव्हमध्ये ही वाढ केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्र सरकार मॅटरनिटी लीव्हचा काळ याबाबत देखील अधिसूचना जारी करु शकतो. १९६१ च्या अॅक्टनुसार मॅटरनिटी लीव्हचा आधीचा काळ १२ आठवडे होता. २०१७ मध्ये मॅटरनिटी बेनीफिट अमेंडमेंट अॅक्टनुसार तो आता २६ आठवडे करण्यात आला आहे.


लोकसभेत सरकारने ग्रॅच्युटी पेमेंट सुधारणा विधेयक २०१७ पास केलं आहे. आता खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना २० लाख रुपयांपर्यंत टॅक्स फ्री ग्रॅच्‍युटी रक्कम मिळणार आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना ही २० लाखांपर्यंत टॅक्‍स फ्री ग्रॅच्‍युटीची तरतूद आहे.


पेमेंट ऑफ ग्रॅच्‍युटी बिलनुसार कोणत्याही खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना १० लाखापर्यंतची ग्रॅच्युटी मिळत होती. पण पेमेंट ऑफ ग्रॅच्‍युटी अमेंडमेंट बिलमुळे याची सीमा वाढणार का याबाबत केंद्र सरकार अधिसूचना जारी करु शकते. श्रम आणि रोजगार मंत्री संतोष गंगवार यांनी म्हटलं की, खासगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी टॅक्स फ्री ग्रॅच्‍युटीची रक्कम २० लाखांपर्यंत होऊ शकते.