नवी दिल्ली : केंद्र सरकारने गुरूवारी राहुल गांधी यांनी पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी सोबतच्या फोटोवरून उठवलेल्या प्रश्नांवर पलटवार केलाय. 


फोटोंचं राजकारण बंद करावं


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद हे पत्रकार परिषदेत म्हणाले की, कॉंग्रेसचं नीरव मोदीला छोटा मोदी म्हणनं निंदनीय आहे. कॉंग्रेसने फोटोंचं राजकारण बंद करावं. दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या कार्यक्रमात नीरव मोदीची पंतप्रधान मोदींसोबत भेट झाली नव्हती. 


नीरव मोदीवर कारवाई होणार


रविशंकर प्रसाद म्हणाले की, नीरव मोदी त्यांच्या कामासाठी दावोसला गेले होते. नीरव मोदी सीआयआयच्या निमंत्रणावरून दावोसला गेले होते. पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून ते तिथे गेले नव्हते. कॉंग्रेस नेत्यांची जो फोटो दाखवला आहे तो फोटो सीआयआयचा ज्वॉईंट फोटोशूट आहे. घोटाळेबाजाचं उंची आणि पद कोणतही असलं तरी त्याच्यावर कारवाई होणार. नीरव मोदीच्या १३०० कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे. 



राहुल गांधींचाही नीरव मोदीसोबत फोटो


रविशंकर प्रसाद यांनी दावा केलाय की, राहुल गांधी यांचाही नीरव मोदीसोबत फोटो आहे. कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी नीरव मोदीच्या ज्वेलरी इव्हेंटमध्ये गेले होते. त्यामुळे त्यांनी फोटोचं राजकारण बंद करावं. 


राहुल गांधींनी ट्विट करून केला होता आरोप



कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गुरूवारी म्हणाले होते की, हिरे व्यापारी नीरव मोदीकडून देशातील दुसरी सर्वात मोठ्या बॅंकेतून ११,५०० कोटी रूपयांचा घोटाळा ‘भारताला लुटण्याचा’ची पद्धत आहे. ज्यात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदीसोबत जवळीक वाढवली, त्यांना जवळ केलं आणि नंतर उद्योगपती विजय माल्यासारहा देशातून फरार झाला.