मुंबई : धनत्रयोदशीच्या दिवशी सोनं खरेदी करणं शुभ मानलं जातं. पण सोन्याचे भाव खूरच जास्त झाल्याने लोकं ते खरेदी नाही करु शकत. त्यामुळे मोदी सरकारने एक नवी योजना आणली आहे. मोदी सरकार धनत्रयोदशीच्या दिवशी स्वर्ण बाँड योजनेची सुरुवात करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अर्थ मंत्रालयांच्या एका अधिकाऱ्याने म्हटलं की, ही योजना 5 ते 9 नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. यासाठी 3,183 रुपये प्रति ग्रॅमच्या दराने सोनं खरेदी करता येणार आहे. ऑनलाइन किंवा डिजिटल माध्यमातून 50 रुपये प्रति ग्रॅममागे सूट मिळणार आहे. यासाठी स्वर्ण बाँडचं मूल्य 3,133 रुपए प्रति ग्रॅम असेल.


सरकारने नोव्हेंबर 2015 मध्ये सॉवरेन स्वर्ण बाँड योजना सुरु केली होती. योजनेच्या अंतर्गत कमीत कमी एक ग्रॅम सोन्यासाठी बाँड खरेदी केला जाऊ शकतो. प्रत्येक वर्षी 500 ग्रॅम सोनं खरेदी करण्याची मर्यादा आहे. यामागचा उद्देश सोन्याची भौतिक मागणी कमी करण्याचा आहे. या योजनेमुळे बाँडला सोन्याच्या प्रति ग्रॅम प्रमाणे मोजलं जातं. आरबीआयच्या सूचनेनुसार सरकारी स्वर्ण बाँड ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2019 दरम्यान प्रत्येक महिन्याला जारी केले जातील.


या बाँडची विक्री बँक, स्‍टॉक होल्डिंग्‍स कॉरपोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसएचसीआयएल), पोस्ट ऑफीस आणि नॅशनल स्‍टॉक एक्‍सचेंज आणि बीएसईच्या माध्यमातून होणार आहे. या योजनेमुध्ये 9 नोव्हेंबर दरम्यान खरेदी केले जाणारे बाँड 13 नोव्हेंबरला जारी केले जाणार आहेत.


य़ानंतर 24 ते 28 डिसेंबरच्या मध्ये बाँड खरेदी केले जाऊ शकतात. हे बाँड 1 जानेवारी 2019 ला दिले जाणार आहेत. 14 ते 18 जानेवारी दरम्यान पुन्हा त्याची विक्री सुरु होईल. 22 जानेवारीला ते ग्राहकाला दिले जातील. त्यानंतर शेवटी 4 ते 8 जानेवारी दरम्यान पुन्हा विक्री केली जाईल. 12 फ्रेब्रुवारीला ते ग्राहकांना दिले जातील.