मुंबई : कर्जाच्या ओझाखाली बुडालेल्या एअरइंडिया या सरकारी विमानसेवेतून बाहेर पडण्याचा मोदी सरकारच्या प्रयत्नांना मोठा झटका बसला आहे. 31 मे पर्यंत एअर इंडियाचे मालकी हक्क विकत घेण्यासाठी एकही खरेदीदार पुढे आलेला नाही. टाटा, जेट एअरवेज, इंडिगो या तीन खाजगी विमानसेवा देणाऱ्या कंपन्यांनी सुरूवातीला एअर इंडियामध्ये मालकी हक्क विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३१ मे पूर्वी कुणीही अधिकृत बोली सादर केलेली नाही. या आधी बोली लावण्याची मुदत १४ मे निश्चित करण्यात आली होती. पण कुणीही खरेदीसाठी उत्सुक नसल्याचं पुढे आले आहे. त्यामुळे ही मुदत आणखी पंधरा दिवसांसाठी वाढवण्यात आली. पण वाढीव मुदतीही एकही कंपनी पुढे आलेली नाही. सरकारनं एअर इंडियातील ७६% समभागांची विक्री करून मालकी हक्क सोडण्याचा निर्णय घेतला होता. एअर इंडियावर साधारण ५० हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे.


आणि या कर्जाच्या बोजामुळेच कुणी या सरकारी कंपनीला हात लावायला तयार नसल्याचं आता पुढे येत आहे.