Meal with Mom : कोरोनाच्या (Corona) प्रादुर्भावामुळे गेल्या दोन वर्षात लोकांना कोणताही सण साजरा करता आला नव्हता. आता देशात कोरोनाची परिस्थिती काहीप्रमाणात आटोक्यात आली आहे. त्यामुळे यंदा नव्या उत्साहाने नव्या जोमाने देशवासीय सण साजरे करताना दिसत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज देशभरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला जात आहे. अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. होळीनिमित्ताने मोदी सरकारने (Modi Government) देशवासियांना एक आवाहन केलं आहे. 


आपल्या आईसोबत जेवण करतानाचा फोटो शेअर करण्याचा आवाहन मोदी सरकारने MyGovIndia च्या ट्विटरवरुन केलं आहे. यासाठी #MaaKeSangKhana किंवा #MealWithMom हे हॅशटॅग वापरण्याचं आवाहनही केलं आहे. आईसह जेवणाचा फोटो शेअर करुन रंगाचा सण साजरा करा असं या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 


यातील काही निवडक फोटो सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर केले जाणार आहेत. 



मोदींनी घेतली आईची भेट
नुकत्याच झालेल्या चार राज्यातील निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवलं. या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narenda Modi) यांनी गुजरातमध्ये रॅली काढली, यावेळी त्यांनी आईची भेटही घेतली. 2019 नंतर दोन वर्षांनी पंतप्रधान मोदी यांनी आई हिराबेन यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी आईचे आशिर्वाद घेतले आणि तिच्याबरोबर जेवणाचा आस्वादही घेतला. 


यावेळचा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. याच फोटोचा वापर करत MyGovIndia च्या ट्विटरवर अकाऊंटवर भारतीयांना आवाहन करण्यात आलं आहे.