नवी दिल्ली : भारतातील बेरोजगारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक खास योजना आणण्याच्या तयारीत आहेत. झी मीडियाला मिळालेल्या एक्सक्लुझिव्ह माहितीनुसार, सरकार एक अशी सिस्टम तयार करण्याच्या प्रयत्नात आहे ज्यात बेरोजगारांकडून 'फीडबॅक' घेऊन त्यात वेळोवेळी बदल करण्यात येतील... यामुळे तरुणांना झटपट नोकरी मिळण्यासाठी मदत होणार आहे. या योजनेचा सध्या नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.  या योजनेचा फायदा त्याही लोकांना होईल ज्यांना वेळीच नोकरी मिळेल... कारण, अशा लोकांची सूचना सिस्टममध्ये अपडेट होताच हटविली जाईल. 


बेरोजगारांशी संवाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

झी मीडियाला मिळालेल्या माहितीनुसार, आता सरकार तुम्हाला विचारणार आहे की जिथं तुम्ही नोकरीसाठी अर्ज दाखल केला होता, तिथं तुम्हाला नोकरी मिळाली किंवा नाही. या प्रश्नावर मिळालेल्या बेरोजगार तुरुणांच्या उत्तरांवर आधारित वेगवेगळ्या रणनीती सरकारकडून अंमलात आणण्यात येईल. यासाठी तुम्ही नोकरीसाठी रजिस्ट्रेशन केल्यानंतर दोन - तीन महिन्यांनी तुमच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे तुम्हाला नोकरी मिळाली अथवा नाही, हा प्रश्न विचारला जाईल. याच्या उत्तरादाखल तुम्हाला हो किंवा नाही असं उत्तर द्यावं लागेल. 


कामगार मंत्रालयाच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नॅशनल करिअर सेंटर द्वारे ही सुविधा लवकरच सुरु केली जाणार आहे. बरोजगार तरुण या प्लॅटफॉर्मवरून नोकरीसाठी अर्ज करू शकतील... आणि त्यांना कॉल किंवा मॅसेजद्वारे नोकरी मिळाली किंवा नाही याबद्दल विचारणा करण्यात येईल. 


इतरही अनेक फायदे


कामगार मंत्रालयाच्या माहितीनुसार, या सुविधेचे आणखीन फायदे होणार आहे. जर तुम्ही अनेक महिन्यांपासून नोकरीच्या शोधात असाल तर सरकारकडे अशा लोकांचा आकडाही उपलब्ध असेल. त्याद्वारे अशा लोकांना नोकरी मिळण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करता येऊ शकतील. म्हणजेच, नोकरी का मिळत नाही? टेक्निकल किंवा स्किल ट्रेनिंगची गरज आहे का? आणि ही मदत सरकारकडून पुरविली जाऊ शकते.