PF Contribution: नोकरीवर असणाऱ्या आणि पगार घेणाऱ्या मोठ्या वर्गासाठी सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखालील सरकार काही खास बेत आखण्याची तयारी करताना दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात अनेक पगारदारांना या निर्णयाचा फायदा होणार असून, याचे सकारात्मक परिणाम त्यांच्या खात्यातील रकमेवर दिसणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ईपीएफओ आणि ईपीएस खात्यांमध्ये जमा केल्या जाणाऱ्या पैशांमध्ये वाढ करण्याचा विचार सध्या सरकारकडून केला जात असल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. फायनॅन्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांच्यावतीनं सादर करण्यात आलेल्या अहवालात असा दावा करण्यात आला आहे. ज्यामुळं सध्या कर्मचाऱ्यांच्या ईपीएफओ आणि ईपीएस खात्यांमध्ये जमा केल्या जाणाऱ्या रकमेमध्ये वाढ केली जाण्याची शक्यता आहे. 


रक्कम किती प्रमाणात वाढणार? 


याआधी कर्मचाऱ्यांच्या खात्यातील रक्कम 6500 रुपयांपर्यंत मर्यादित होती. 2014 मध्ये ती वाढवून 15000 रुपये करण्यात आली. त्यानंतर मात्र यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नाही. आता मात्र हीच रक्कम 21000 रुपये करण्याचा विचार सरकारच्या वतीनं केला जात असल्याची माहिती समोर आली आहे. 


थेट शब्दांत सांगावं तर आता कर्मचाऱ्यांना ईपीएफओ आणि ईपीएस खात्यांमध्ये जास्त पैसे जमा करता येणार आहेत. नवा नियम लागू झाल्यास याचा थेट फायदा पगारदार वर्गाला मिळणार असून, याचा सकारात्मक परिणाम कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शन स्वरुपात मिळणार आहे. 


सध्याचा नियम कसा काम करतो? 


जर कर्मचाऱ्यांचा पगार 15000 रुपये असेल तर नोकरदाराच्या वतीनं 12-12 टक्के ईपीएफ जमा करावा लागतो.पण, इथं नोकरदाराची रक्कम दोन भागांमध्ये विभागली जाते. यामध्ये 8.33 टक्के रक्कम ईपीएस आणि उर्वरित 3.67 टक्के रक्कम ईपीएफमध्ये जमा केली जाते. थोडक्यात 15000 चा पगार असणाऱ्या व्यक्तीला दर महिन्याला 12 टक्के म्हणजेच 1800 रुपये ईपीएफ खात्यात जमा करावे लागतात. याशिवाय कंपनीकडूनही पगारातील 12 टक्के रक्कम या खात्यात दमा केली जाते. पण, या रकमेची दोन गटात विभागणी होऊन तो ईपीएफ आणि ईपीएसमध्ये विभागला जातो. यामध्ये 1250 रुपये ईपीएस आणि 550 रुपये ईपीएफ अशी विभागणी केली जाते. 


हेसुद्धा वाचा : स्टेशन, बाजार, उद्यानं सर्वकाही जवळ; दसऱ्याच्या मुहूर्तावर CIDCO  ची बंपर लॉटरी, कोण ठरणार लाभार्थी? 


केंद्राकडून आता ईपीएफमध्ये जमा होणारी रक्कम मर्यादा वाढवून 21000 रुपये केल्यास गणित बदलणार आहे. कारण, 21000 रुपयांच्या पगारावर दर महिन्याला 12 टक्के म्हणजेच 2520 रुपये इतकी रक्कम पीएफ स्वरुपात कापली जाईल. याशिवाय कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या योगदानामध्ये 771 रुपये ईपीएफ खात्यात जमा केले जाणार असून, उर्वरित 1749 रुपये ईपीएस खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत.


कर्मचाऱ्यांना कसा होणार फायदा? 


एखाद्या व्यक्तीनं वयाच्या 23 व्या वर्षापासून ईपीएफमध्ये पैसा जमवण्यास सुरुवात केली आणि वयाच्या 35 व्या वर्षापर्यंत त्यांच्या मूळ पगाराचा आकडा 15000 रुपये असेल तर निवृत्तीपर्यंत त्यांना एकूण 71.55 लाख रुपये मिळतील. यामध्ये 60.84 लाखांचं निव्वळ व्याज असेल. तर, मूळ जमा रक्कम 10.71 लाख रुपये इतकी असेल. 8.25 टक्क्यांच्या वार्षिक व्याजावर ही रक्कम आधारित आहे. सरकारनं आता ईपीएफ रकमेची मर्यादा वाढवून 15000 हून 21000 केल्यास कर्मचाऱ्याला एकूण 1 कोटी रुपये मिळतील यामध्ये 15 लाखांची रक्कम कर्मचाऱ्यांनी जमा केलेली असेल तर, उर्वरित 85 लाख रुपये हे व्याजाच्या रकमेचे असतील. म्हणजेत आधीच्या तुलनेत कर्मचाऱ्यांना थेट 28.45 लाखांचा फायदा होणार आहे.