केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग
केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय. येत्या रविवारी सकाळी हा शपथविधी होणार आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रीमंडळ फेरबदलाच्या हालचालींना वेग आलाय. येत्या रविवारी सकाळी हा शपथविधी होणार आहे.
पंतप्रधानांच्या निवासस्थानी मोदी आणि भाजपा अध्यक्ष अमित शाह यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत गेल्या तीन वर्षातल्या मंत्र्यांच्या कामगिरीवर आधारित मंत्र्यांच्या खुर्च्या राहणार की जाणारावर निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक मंत्र्याला P म्हणजे पॉझिटिव्ह आणि N म्हणजे निगेटिव्ह असे शेरे देण्यात आले आहेत. ज्यांना P शेरा मिळाला त्यांचं मंत्रीपद कायम राहणार आहे. तर ज्यांना N शेरा मिळालाय त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळणार आहे.
आतापर्यंत राजीवप्रताप रुडी आणि उमा भारती, संजीव बालियान यांनी आपल्या मंत्रीपदाचे राजीनामे सोपवलेत. त्यांना पक्षाचं काम करण्यासाठी पाठवलं जाईल, अशी शक्यता आहे. याखेरीज कलराज मिश्र, निर्मला सीतारामन यांची मंत्रीपदंही जाण्याची शक्यता आहे.
मंत्रीमंडळ फेरबदलात अनेक महत्त्वाच्या मंत्र्यांची खाती बदलली जाण्याची शक्यता आहे. अरूण जेटलींकडे दोन महत्त्वाच्या खात्यांचा कारभार आहे. अर्थ किंवा संरक्षण मंत्रालयापैकी एक खातं दुसऱ्या बड्या मंत्र्याकडे सोपलं जाऊ शकतं. नुकतेच एनडीएमध्ये आलेले जेडीयू आणि अण्णाद्रमुकच्या नेत्यांना मंत्रीपद मिळण्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय.