नवी दिल्ली : लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर धन्यवाद प्रस्तावादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करत आहेत. विरोधी पक्षाचं लोकसभेत जोरदार गोंधळ सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गोंधळामध्येच भाषणाला सुरुवात केली. टीडीपी आणि काँग्रेसचे नेते लोकसभेत घोषणाबाजी करत आहेत.


सत्तेचा दुरुपयोग


पीएम मोंदींनी म्हटलं की, देशात 90 हून अधिक वेळा धारा 356 चा दुरुपयोग केला गेला. राज्य सरकारांना तुम्ही मुळाशी संपवलं. पंजाब, तमिळनाडूमध्ये ही असंच केलं. जेव्हा आत्म्याची आवाज येतो तेव्हा काँग्रेसचं लोकतंत्र गायब होतं.


नेहरुंवरुन टीका


पीएम मोदींनी म्हटलं की, 'तुमच्या पक्षाच्या सरकारने जेव्हा एक निर्णय घेतला तेव्हा तुमच्या एका पदाधिकाऱ्याने त्या निर्णयाचे तुकडे केले. त्यांनी म्हटलं की, देशात काँग्रेसमध्ये नेतृत्वासाठी निवडणूक झाली. 15 काँग्रेस कमिट्यांपैकी 12 काँग्रेस कमिट्यांनीने सरदार पटेल यांची निवड केली. 3 जणांना नोटा निवडलं. मग ती कोणती लोकशाही होती जेव्हा तरी पंडित नेहरूंना पंतप्रधान केलं गेलं. असं जर केलं नसतं झालं तर आज काश्मीरचा भाग पाकिस्तानकडे नसता.'