नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी विज्ञान भवनात केलेल्या भाषणात इमानदारीच्या मुख्यप्रवाहात आलेल्या सर्वांचे स्वागत केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्यापाऱ्यांचे जुने रेकॉर्ड चेक करणार या गोष्टीमुळे व्यापारी खूप टेन्शनमध्ये आहेत. पण पंतप्रधान मोदी यांनी व्यापाऱ्यांना आश्वास्त केले की असे काहीही होणार नाही. 


तसेच जीएसटीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. 


दिल्लीत कंपनी सेक्रेटरी सुवर्ण महोत्सवी समारंभात मोदी बोलत होते. आपल्या भाषणात आर्थिक निर्णयावर प्रश्न विचारणाऱ्यांवर सडेतोड उत्तर दिले. 



पंतप्रधानांच्या भाषणातील १० मुद्दे 


१) जीएसटीमध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येणार 


२)  गेल्या सरकारमध्ये ८ वेळा महागईचा दर ५.७ टक्के पर्यंत पोहचला होता. देशाने ०.२ टक्के विकास दर पाहिला आहे. 
३) मी अर्थशास्त्रज्ञ नाही किंवा मी असल्याचा दावा करत नाही. 


४) देशाच्या अर्थशास्त्राला वेगळ्या दिशने नेण्यात आले होते. 


५) आज परकीय गुंतवणूकदार भारतात विक्रमी गुंतवणूक करीत आहे. 


६) अर्थव्यवस्थेत सुधारणा काही लोकांना आवडत नाही आहे. 


७) मोठ मोठे अर्थशास्त्रज्ञ असताना फ्रेजाईल ५ मध्ये कसे जोडले गेले. 


८) विचार करावा लागेल करी काही लोक देशाच्या हिताने काम करीत आहे की कोणाच्या हितासाठी 


९) बदललेल्या अर्थव्यवस्थेत इमानदारीला प्रीमीयम मिळणार 


१०) अर्थव्यवस्थेत बदलाचे निर्णय घेत आहे आणि घेत राहणार... आम्ही प्रत्येक क्षेत्राच्या मदलीसाठी तयार आहेत.