वॉशिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर बुधवारी वॉशिंग्टन डीसी विमानतळावर उतरले. तेव्हा त्यांची लोकप्रियता स्पष्ट होती. तेथे उपस्थित भारतीयांनी मोदी-मोदींच्या घोषणा दिल्या. मोदींच्या अमेरिका भेटीचे एक छायाचित्र व्हायरल झाले आहे. यामध्ये ते विमानात काम करताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोसह, मोदींनी ट्विट केले होते- 'लांब उड्डाण म्हणजे कागदपत्रांचे काम आणि काही फाईलवर काम करण्याची संधी.' या फोटोनंतर काही इतर नेत्यांचे फोटो ही ट्विटरवर शेअर केली जात आहेत. सोशल मीडियावर मोदी ट्रेंडमध्ये आहेत.


#ModiInAmerica सोशल मीडियावर ट्रेंडिंग होत आहे. पंतप्रधान मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान विमानात काम करताना दिसत आहेत.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 7 वर्षात एकही दिवस सुट्टी घेतली नाही. ते दररोज सुमारे 18 तास काम करतात.


भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय लाल बहादूर शास्त्री यांचे एक जुने चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या फोटोसह शेअर करण्यात आले आहे.


अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकार स्थापन झाल्यानंतर दहशतवाद हा जगासाठी मोठा प्रश्न बनला आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील चांगल्या संबंधांमुळे पाकिस्तान त्रस्त आहे. दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेच्या (सार्क) देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक 25 सप्टेंबरपर्यंत रद्द करण्यात आली. 


एएनआय या वृत्तसंस्थेच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान या बैठकीत तालिबानच्या प्रतिनिधीला समाविष्ट करण्याचा प्रयत्न करत होता. पण भारत आणि इतर देशांनी हे होऊ दिले नाही.