मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सोमवारी 10 दिवसाच्या बिहार यात्रेवर आहेत. भागवत 6 ते 15 फेब्रुवारीपर्यंत बिहार दौऱ्यावर असणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गाय आणि उन्नत शेतीवर ते चर्चा करणार आहेत. सोमवारी ते पटना पोहचणार आहेत. मोहन भागवत राजेंद्र नगरमधील आरएसएस कार्यालयात रात्री थांबणार आहेत.


6 फेब्रुवारीला ते मुजफ्फरपूरला जाणार आहेत. 10 फेब्रुवारीपर्यंत मुजफ्फरपूरमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये ते भाग घेणार आहेत. शेतकरी, गौ-पालक, कृषी आणि ग्रामीण विषयांवर आयोजीत बैठकांचे ते अध्यक्ष असणार आहेत.


11 फेब्रुवारीला पटनाला आल्यानंतर संघप्रमुख संवर्धन कार्यक्रमात भाग घेणार आहेत. 12 फेब्रुवारीला अनेक बैठकांमध्ये ते सहभागी होणार आहेत. 15 फेब्रुवारीला मोहन भागवत हे पटना येथून वाराणसीला रवाना होणार आहेत.