`संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही`
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे.
नवी दिल्ली : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं ट्रोलिंगला समर्थन नाही, असं वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. सोशल नेटवर्किंगवर सुरु असलेलं ट्रोलिंग हे प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याचं मोहन भागवत म्हणालेत. ट्रोलिंग सारख्या आक्रमक गोष्टींचं आम्ही समर्थन करत नाही, अशी प्रतिक्रिया मोहन भागवत यांनी दिली आहे.
संघ परिवार भेदभावावर विश्वास ठेवत नाही. भेदभावाशिवाय देशाचं एक येणं आमचं लक्ष्य आहे. संघ भारतामध्ये स्वास्थ्य, शिक्षा, ग्रामीण विकास यासारख्या योजना राबवत असल्याचं भागवत म्हणाले.