इंदोर : स्कूटरवरून प्रवास करणाऱ्या एका तरूणीसोबत छेडछाड करणाऱ्या नराधमांनी तिचा स्कर्ट उतरवण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार पुढे येत आहे. मध्य प्रदेशातील इंदोर येथे ही घटना घडली आहे. नराधमांच्या या कृत्यामुळे तरूणीच्या स्कूटरचा अपघात झाला. यात तरूणी जखमी झाली. दरम्यान, हा प्रकार घडल्यावर तरूणीने ट्विटरच्या माध्यमातून घडला प्रकार शेअर केला. त्यानंतर मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान  यांनी आरपींना शोधून काडा व लवकर अटक करा असे आदेश पोलिसांना दिले आहेत. 


स्कर्ट खेचताना तरूणीच्या दुचाकीला अपघात


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तरूणीने या धक्कादायक प्रकाराबाबत ट्विटर आणि इस्टाग्रामवर माहिती दिली आहे. ट्विटरवर या ट्विटरला हजारो रीट्विट्स मिळाले. युवतीने या प्रकारादरम्यान घडलेल्या अपघातात शरीरावर झालेल्या जखमांचे एक  छायाचित्रही पोस्ट केले आहे. पुढे तिने म्हटले आहे की, 'दोन दुचाकीस्वारांनी माझ्या स्कूटरचा पाटलाग केला. तसेच, माझा स्कर्ट खेचून याच्या खाली काय आहे ? दाखव अशी विचारणा केली. मी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला पण, त्यात माझे स्कूटरवरचे नियंत्रन सूटले आणि माझा अपघात झाला.' 



ट्विटरवर व्यक्त झाला संताप


हा प्रकार कथन केल्यावर तरूणीने एकामागून एक अनेक ट्विट्स करत आपला राग व्यक्त केला आहे. तरूणीने म्हटले आहे की, 'हे इंदोरमधील एका सार्वजनिक रस्त्यावर घडले आहे. तिथे उपस्थित असलेल्या एकाही व्यक्तिने या प्रकाराला विरोध करण्याचा प्रयत्न केला नाही. हा प्रकार करून ते पळून गेले मी त्यांचा नंबरही टीपू शकली नाही.'



नागरिकांची बघ्याची भूमिका


पुढच्या ट्विटमध्ये युवती म्हणते, मी काय परिधान करावे ही माझी पसंती आहे. मी स्कर्ट परिधान करण्याचा अर्थ असा नव्हे की, कोणी माझ्यासोबत असे वर्तन करावे. जर वेळ रात्रीची असती आणि मी रस्त्यावर एकटी असते तर! अनेक मुलींसोबत असेच घडते. पण, त्या गप्प राहतात. पण, मी पोलिसांत तक्रार करत आहे. माहित नाही ते त्यांना शोधू शकतील किंवा नाही. पण, हे आवश्यक आहे.



मुख्यमंत्र्यांनी दिली मदतीची हमी


दरम्यान, तरूणीचे हे ट्विट व्हायरल होताच मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तरूणीचे ट्विट कोट करत म्हटले आहे की, 'हे अत्यंत लाजिरवाणे आहे. त्यांना त्वरीत शोधून काढा आणि त्यांच्यावर कारवाई करा. इंदोरचे कलेक्टर आणि डीजीपी या प्रकरणात कारवाई करून मला या प्रकरणाची त्वरीत माहिती द्या.' 




तरूणीने मानले आभार


पुढच्या ट्विटमध्ये शिवराज यांनी म्हटले आहे की, 'बेटा आकर्षि, तुझ्या धाडसाचे मी कौतुक करतो. मी आणि माझे प्रशासन तुझ्या मदतीसाठी कटीबद्ध आहोत. त्या नराधमांची चौकशी करून आम्ही तुला लवकरच न्याय देऊ.'



दरम्यान, शिवराज सिंह चौहान  यांच्या ट्विटनंतर पीडितेने त्यांचे आभार मानले आहेत.