भररस्त्यात Money Heist स्टाईलने उधळल्या नोटा, गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड अन्..., पाहा Video
Money Heist In Jaipur : राजस्थानची राजधानी जयपूरमधून एक व्हिडीओ (Viral Video) समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये.
Man Showers Money Viral Video : नेटफलिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर (NetFlix) मनी हाईस्ट (Money Heist) ही वेब सिरीज खुप प्रसिद्ध झाली होती. सर्वात मोठ्या चोरीची थरारक घटना यामध्ये दाखवण्यात आली आहे. हा वेब सिरीज (Web Series) पाहून अनेकांच्या अंगावर काटा आलाय. या सिरीजने प्रेरित होऊन भारतात देखील चोरीच्या घटना समोर आल्या होत्या. अशातच राजस्थानची राजधानी (Money Heist In Jaipur) जयपूरमधून एक व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमध्ये एका अज्ञान व्यक्तीने भररस्त्यात नोटांची (Money Showers) उधरण केलीये. त्यामुळे सर्वत्र एकच गोंधळ उडाल्याचं पहायला मिळतंय.
भारतीय चलन लुटणाऱ्या व्यक्तीने मनी हाईस्टचा मुखवटा घातलेला होता. व्हिडिओ व्हायरल (Viral Video) झाल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. वेब सीरिजच्या पात्राप्रमाणे लाल रंगाचा पोशाख घातला होता आणि त्याचा चेहरा मास्कने झाकलेला होता. त्यामुळे ही व्यक्ती मनी हाईस्ट सिरीजने प्रभावित असल्याचं दिसतंय. अचूक पोशाख परिधान करत त्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं अन् गाडीवर चढून पैसा हवेत उधळला.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये लाल रंगाचे कपडे घालणारी व्यक्ती कारच्या वरून नोटा फेकताना दिसत आहे. तसेच, फेकून दिलेले पैसे जमा करताना रस्त्यावर लोकांची गर्दी देखील जमलीये. कामावर जाणारा असो वा रिक्षा चालक सर्वांनी हात साफ करून घेतले. ही घटना सोमवारी संध्याकाळी जयपूरच्या जीटी सेंट्रल मॉलजवळ घडल्याचं समोर आलंय. संध्याकाळची वेळ असल्याने अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली होती.
पाहा Video
दरम्यान, पोलिसांकडून आरोपी तरुणाची अधिक चौकशी सुरू आहे. त्याच्याबद्दलची अधिक माहिती जमा केली जातीये. कारच्या नंबरच्या आधारावरून माहिती काढली जातीये. मात्र, सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. उधळल्या गेलेल्या नोटा असली आहेत की नकली? असा प्रश्न देखील सोशल मीडियावरून लोक उपस्थित करताना दिसत आहेत.