धक्कादायक, काश्मीरमधील दहशतवादाला मुंबईतून पैसा?
काश्मीमधील दहशतवादाला मुंबईतून पैसा पुरवला जात असल्याची गुप्तहेर खात्याची माहिती आहे.
नवी दिल्ली : काश्मीमधील दहशतवादाला मुंबईतून पैसा पुरवला जात असल्याची गुप्तहेर खात्याची माहिती आहे. मुंबईतले काही हवालाचालक आणि काही एनजीओ गुप्तहेरांच्या रडारवर आहेत. मुंबई आणि परिसरात जकातीच्या नावाखाली या संस्था पैसा गोळा करत असल्याचा संशय आहे.
दक्षिण मुंबईतल्या काही हवाला ऑपरेटर्सनी काही बनावट कंपन्या उघडल्या आहेत असाही संशय आहे. याच कंपन्यांच्या माध्यमातून पाकिस्तान, दुबई, मलेशिया या देशातून मिळणारा निधी बँकांच्या माध्यमातून भारतात आणला जात आहे असा संशय आहे.